करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोर्टी येथून बांधकामासाठी ठेवलेले पत्र्याच्याशेडमधील सेंट्रिंगचे साहित्य चोरीला गेले असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात एका अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सेंट्रिंगचे काम करणारे सागर झुंबर सायकर (रा. राशीन, ता. कर्जत, जि. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये लोखंडी प्लेट, फ्लाऊड असा सुमारे ६२ हजाराचे साहित्य चोरीला गेले आहे.

कोर्टी येथे अशोक नारायण शिंदे यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामासाठी लागणारे सेंट्रिंगचे साहित्य एका पत्राशेडमध्ये ठेवले होते. २९ तारखेला त्यांनी सेंट्रिंगचे साहित्य पत्राशेडमध्ये ठेवले होते. ३० तारखेला त्यांनी कामाच्या ठिकाणी पहिले तर पत्राशेडच्या दरवाजाचे कुलूप तोडून साहित्य चोरीला गेल्याचे दिसले. त्यावरून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

