सोलापूर : नववर्षा निमित्ताने सरकारने अनुज्ञप्त्याच्या बंद करण्याच्या वेळेत सुट देवून एफएल 2, एफएल 3, सीएल 3, एफएलबिआर 2, एफएलडब्लू 2, एफएल 4 (क्लब अनुज्ञप्ती), नमुना ई (बिअर बार) व ई 2 अनुज्ञप्याच्या निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी उघड्या ठेवण्यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 139 (1) (सी) व कलम 143 (2) (एच 1) (iv) अन्वये सरकारने मंजुरी दिलेली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एफएल 2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलडब्लु 2, एफएलबिआर 2 (बंद बाटलीतुन बिअर विक्री) रात्री 1 वाजेपर्यंत, एफएल 3 (परवाना कक्ष), एफएल 4 (क्लब अनुज्ञप्ती), ई 2 पहाटे 5 वाजेपर्यंत व सीएल 3 महापालिका तसेच ‘अ’ व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तीसाठी 1 वाजेपर्यंत सुरु राहतील.