करमाळा (सोलापूर) : सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त श्री कमलादेवी कन्या विद्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाल आनंद मेळावा घेण्यात आला. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक गणेश चिवटे, शाम पुराणिक, सुनिल सूर्यपुजारी, महेश परदेशी, प्रविण गायकवाड, प्रशालेच्या मुख्याध्यापिका शेलार, सिताबई परदेशी, विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका भागवत उपस्थित होते.
यावेळी बाल आनंद मेळावा झाला. विद्यार्थिनींना नफा तोटा, व्यवहार ज्ञान व संवाद कौशल्य याची माहिती होऊन आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून हा आनंद मेळावा ठेवला होता. विद्यार्थिनींना विविध संतुलित आहार, फळे, फळभाज्या, पालेभाज्या आदींचे महत्त्व कळते. या उद्देशाने प्रशालेत दरवर्षीप्रमाणे बाल आनंद मेळावा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यावेळी विद्यार्थिनींकडून विविध प्रकारचे फळे पालेभाज्या फळभाज्या संतुलित आहार तसेच विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीस ठेवले होते.