करमाळा (सोलापूर) : येथील सुतार गल्लीतील नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाच्या वतीने बुधवारी (ता. ७) सकाळी १० वाजता सामूहिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गणेशभक्तांनी सहभाग घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहाण्याचे आवाहन नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाने केले आहे. श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) अंतर्गत प. पु. गुरुमाऊली यांनी गणेशोत्सवात ‘एक कोटी अथर्वशीर्ष पठण’ करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यानुसार करमाळा येथे नवजवान सुतार तालीम तरुण मंडळाने कार्यक्रम आयोजित केला आहे. याला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.