करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्र सुरु झाले आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी आज (गुरुवारी) या केंद्राचे फीत कापून उदघाटन केले आहे. यावेळी नायब तहसीलदार काझी, बाबासाहेब बाबासाहेब गायकवाड उपस्थित होते. केंद्र चालक गोपाल घाडगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नागरिकांना येथे सर्व प्रकारचे दाखले मिळणार आहेत. याशिवाय कोणत्या दाखल्यासाठी किती शुल्क आकारले जाणार व कालावधी लागणार आहे याचा फलकही दर्शनी भागात लावण्यात आला आहे.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/06/Kemkar-I-Cair-1024x738.jpg)
करमाळा तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्र वर्षभरापासून बंद होते. त्यामुळे नागरिकांनी सुविधा मिळण्यासाठी अनेकदा अडचण येत होती. ‘आपले सरकार’मधून सुविधा मिळत होत्या. मात्र काही ठिकाणी नागरिकांची लूट केली जात असल्याचा आरोप केला जात होता. तहसीलच्या आवारातच असलेल्या ‘निंबाळकर सेतू’मध्ये चांगली सुविधा दिली जात असल्याची अनेकांनी भावना व्यक्त केली होती. मात्र एकाच केंद्रावर अनेकदा गर्दी होत होती.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/06/Amol-Ghadge-1024x512.jpeg)
सध्या शाळा व महाविद्यालये सुरु झाली असल्याने विद्यार्थी व नागरिकांची उत्पनाचे दाखले, जातीचे दाखले, नॉनक्रिमिनल, अल्पभूधारक, रहिवाशी दाखले, वारस प्रमाणपत्र असे दाखले काढण्यासाठी गर्दी होत आहे. त्यात मराठी कुणबी दाखले काढण्यासाठीही मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे. काही ठिकाणावरून लूट केली जात असल्याचा आरोप केला जात होता. त्यात तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्र सुरु झाले असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
![](https://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240613-WA0061-1024x768.jpg)
तहसीलदार ठोकडे म्हणाल्या, तहसील कार्यालयाच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले देण्यात येणार आहेत. त्यासाठी किती कालावधी लागणार व त्याचे दर किती असणार याचा फलक दर्शनी भागात लावण्यात आला आहे. कोणत्या दाखल्यासाठी काय कागदपत्रे लागणार यांचीही माहिती येथे देण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. कोणी जादा पैशाची मागणी केली तर थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
![](https://kaysangtaa.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240613-WA0060-768x1024.jpg)