करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात गणेशोत्सवानिमित्त मंडळांनी देखावे सादर केले धार्मिक व सामाजिक विषयांवर देखावे सादर करण्यावर भर देण्यात आला होता. याशिवाय सजीव देखाव्यांच्या माध्यमातून जवलंत विषयांवर मंडळांनी भाष्य केले. दत्त पेठ तरुण मंडळाने ‘सोशल मीडियाचे फायदे व तोटे’ सजीव देखाव्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर राशीन पेठ तरुण मंडळानेही सजीव देखावा सादर स्वछता या विषयवार भाष्य केले. कानाड गल्लीतील महर्षी वाल्मिकी मित्र मंडळाने कोरोनावर सजीव देखावा सादर केला होता.





