करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात एका २२ वर्षाच्या तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. या तरुणावर सोलापूरातील एका रुग्णालयात उपचार सुरु होते. १३ एफ्रिलला त्याला सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले होते. १४ तारखेला सकाळी ८ वाजता त्याचा मृत्यू झाला असून त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
करमाळा तालुक्यात शुक्रवारी १०४ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले असून एकुण रुग्णसंख्या ४६७३ झाली असल्याचेही डॉ. जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे. करमाळा तालुक्यात कोरोनाने आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला असून ३७६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ८२५ आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ९२ जणांचा सामावेश असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर