करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लस मोहिमही जोरात सुरु आहे. यातूनच बिटरगाव (श्री) येथील पांडुरंग वस्तीवर सोमवारी १९ एफ्रिलला ४५ वर्षापुढील गावातील नागरिकांना लस दिली जाणार आहे, अशी माहिती सरपंच अभिजीत मुरुमकर यांनी दिली आहे.
सरपंच मुरुमकर म्हणाले, वरकुटे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत बिटरगाव (श्री) येथील उपकेंद्रातर्गत सोमवारी पांडुरंग वस्ती येथे ४५ वर्षापुढील नागरिकांनी लस दिली जाणार आहे. गावातील ४५ वर्षापुढील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा. लस घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. नागरिकांनी लस घेण्यासाठी जेवण करुन यावे. फक्त 60 लस उपलब्ध असल्याचेही सरपंच मुरुमकर यांनी सांगितले आहे.
गावातच लसीकरण ठेवा
लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त होऊ शकते. ६० लसमध्ये सर्व नागरिकाना लस मिळणार नाही. त्यामुळे जास्त लस उपलब्ध कराव्यात. याबरोबर बिटरगावमध्ये लसीकरण ठेवावे, अशी मागणी प्रविण मुरुमकर यांनी केली आहे.