अहमदनगर : अकोले येथे दररोज 100 पेक्षा जास्त कोरोनाबाधीत रुग्ण वाढत आहेत. अकोले शहरात फक्त तीन कोविड सेंटर आहेत. त्यात एक सरकारी आणि दोन खाजगी आहेत. राजूर येथे नव्याने कोविड सेंटर सुरू आहे. हे कोविड सेंटर अपुरे पडत आहेत याचा विचार करून अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने अगस्ति देवस्थान ट्रस्टचे अगस्ति मंदिरा लगत असलेले भक्तनिवासामध्ये 150 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आमदार डॉ. किरण लहामटे, अगस्तिचे व्हा. चेअरमन सिताराम पाटील गायकर, तहसीलदार मुकेश कांबळे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के. डी. धुमाळ, संपत नाईकवाडी, संचालक बाबासाहेब ताजने, अशोकराव आरोटे, अशोकराव देशमुख, गुलाब शेवाळे, महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ, परबत नाईकवाडी, कचरू पाटील शेटे, डॉ शेटे ,रवींद्र मालूनजकर, भानुदास तिकांडे यांच्या उपस्थितीत या कोविड सेंटरचे उद्घाटन झाले.
संपादन : अशोक मुरुमकर