करमाळा तालुक्यातील गुन्हेगारी व प्रशासकीय बातम्या

Crime and Administrative News in Karmala Taluk

करमाळा (सोलापूर) : जिल्ह्यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सर्वांना झेंडे घेता यावेत म्हणून करमाळा तहसील कार्यालयात झेंडे विक्री स्टाॅल लावण्यात आला आहे. नाममात्र दरात म्हणजे 21 रुपयांमध्ये नागरिकांसाठी येथे तिरंगा झेंडा घेता येणार आहे. या स्टाॅलचे उदघाटन तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते झाले. यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते. करमाळा तहसील कार्यालयात हा स्टॊल असून येथे झेंडे खरेदी करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

करमाळा सर्कलमध्ये सर्वाधिक पाऊस
करमाळा (सोलापूर) :
करमाळा शहर व तालुक्यात १४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये करमाळा मंडळामध्ये सर्वाधिक म्हणजे ७२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याबरोबर कोर्टी मंडळामध्ये 06मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. केममध्ये 12 मिलीमीटर, केत्तूरमध्ये 05 मिलीमीटर, जेऊरमध्ये 16 मिलीमीटर, सालसे 08 मिलीमीटर, उमरडमध्ये 19 मिलीमीटर, अर्जुननगरमध्ये 09 मिलीमीटर असा एकूण 147 मिलीमीटर पाऊस झाला असल्याची नोंद करमाळा तहसील कार्यालयाकडे झाली आहे.

साडे येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा (सोलापूर) :
करमाळा तालुक्यातील साडे येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विलास शिवराम जाधव (वय ५८) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल हनुमंत गवळी यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये ९१० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. पांडे बीटमध्ये पेट्रोलिंग सुरु असताना पोलिसांना साडे येथे एकजण बेकायदा दारू विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर संशयित आरोपी जाधव हा बेकायदा दारू विक्री करताना सापडला.

वडशिवणे येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा (सोलापूर) :
करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण बचुटे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये ९०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. केम बीटमध्ये पेट्रोलिंग सुरु असताना पोलिसांना वडशिवणे येथे एक महिला बेकायदा दारू विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर संशयित आरोपी महिला बेकायदा दारू विक्री करताना सापडली. तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

सुमंतनगर येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा (सोलापूर) :
करमाळा शहरातील सुमंतनगर येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दिलीप राम जाधव (वय ४४) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल अतुल लवळे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये १००० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. शहरामध्ये पेट्रोलिंग सुरु असताना पोलिसांना सुमंतनगर येथे एकजण बेकायदा दारू विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर संशयित आरोपी जाधव हा बेकायदा दारू विक्री करताना सापडला.

केत्तूर नंबर २ येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा (सोलापूर)
: करमाळा तालुक्यातील केत्तूर नंबर २ येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भैरू शिवाजी काळे (वय ३३) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल ललित शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये ३०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. जिंती दूर क्षेत्रामध्ये पेट्रोलिंग सुरु असताना पोलिसांना केत्तूर नंबर २ येथे एकजण बेकायदा दारू विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर संशयित आरोपी काळे हा बेकायदा दारू विक्री करताना सापडला.

वांगी नंबर २ येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल
करमाळा (सोलापूर) :
करमाळा तालुक्यातील वांगी नंबर २ येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी दादा धावर (वय ४४) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल अमोल लोकरे यांनी फिर्याद दिली आहे. त्याच्याकडून १००० रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. जेऊर दूरक्षेत्रमध्ये पेट्रोलिंग सुरु असताना पोलिसांना ढोकरी येथे एकजण बेकायदा दारू विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर संशयित आरोपी ढावरे हा बेकायदा दारू विक्री करताना सापडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *