Live वांगीत मनोज जरांगे यांच्या सभेसाठी हजारोंचा जनसमुदाय; पोवाड्यातून प्रबोधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वांगी नंबर १ येथे मनोज जरांगे यांच्या सभेसाठी हजारोंच्या संख्येने समाज बांधव आले आहेत. ७ वाजता सुरु होणाऱ्या या सभेला तालुक्यातील विविध भागातून मराठा समाज बांधव आले आहेत. ही सभा सुरु होण्यासाठी उशीर होऊ शकतो असा अंदाज आहे. मात्र तरीही जरांगे यांना ऐकण्यासाठी समाज बांधव थांबणार आहेत.

मराठा आरक्षणासाठी जरांगे यांनी दौरा सुरु केला आहे. परांडा येथील सभा झाल्यानंतर जरांगे हे करमाळा तालुक्यातील वांगी नंबर १ येथील सभेसाठी येणार आहेत. वांगी येथे उजनीच्या कुशीत होणाऱ्या या सभेसाठी हजारो समाज बांधव १७१ एकराच्या मैदानावर आले आहेत. सभेला उशीर होणार हे गृहीत धरून येथे शाहीर राजेंद्र कांबळे यांनी ‘मराठा आरक्षणावर’ आधारित पोवाडे सादरीकरण सुरु केले आहे. त्यामाध्यमातून त्यांनी मराठा समाज बांधवांचे प्रबोधन सुरू केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *