करमाळा (सोलापूर) : येथील सरकार मित्र मंडळाच्या गणेशोत्सवासाठी अध्यक्षपदी दत्तात्रय भांडवलकर व उपाध्यक्षपदी गणेश जाधव यांची निवड झाली आहे. 2022- 23 या श्री गणेशोत्सवच्या पार्शवभूमीवर सरकार मित्र मंडळाची घोलपनगर येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये श्री गणेशोत्सव स्थापना, विविध उपक्रम व भव्य- दिव्य मिरवणुक काढणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पडलेला खंड पाहता यावर्षी हा सोहळा धुमधडाक्यात साजरा होण्यावर भर देण्यात आला. या बैठकीत मंडळाच्या अध्यक्षव उपाध्यक्ष यांची निवड एकमताने करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा फेटा, हार व श्रीफळ देउन सन्मान करण्यात आला. यावेळी सरकार मित्र मंडळाचे सदस्य सचिन घोलप, सचिन गायकवाड, विजय लावंड, अमोल यादव, राहुल पवार, विजय घोलप, अरुण काका जगताप, स्वानंद वांगडे, विनय ननवरे, संतोष वारे, ॲड. सुनील घोलप, शायर बागवान, जोतिराम लावंड, अमोल कांबळे, विशाल गुळवे, अजित यादव, कविराज माने, साजिद बागवान, अशोक चव्हाण, चेतनशेठ किंगर, ॲड. अमर शिंगाडे, असिर खान, सुहास माने, महेश दिवाण उपस्थित होते.

