करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोमलवाडी येथील २१ वर्षाच्या मानसी दीपक गायकवाड या विद्यार्थिनीचे अल्पशा आजारानेमृत्यू झाला आहे. कराड येथे तिच्यावर उपचार सुरु होते. दोन- चार दिवसांपासून ती आजारी पडली होती. त्यानंतर तिला कराड येथे दाखल करण्यात आले होते. तिचे वडील दीपक गायकवाड हे कराड येथी आयटीआयमध्ये नोकरी करतात. तर मानसी पुणे येथील फर्गुसन काॕलेजमध्ये शिक्षण घेत होती. एमएसस्सीच्या शेवटच्या वर्षात ती शिकत होती. मात्र दोन- चार दिवसांपूर्वी ती आजारी पडली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल केले होते. कराड येथे उपचार सुरु असताना तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्यावर काल (मंगळवारी) पोमलवाडी येथे अंत्यसंस्कार झाले. तिच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


