करमाळा (सोलापूर) : सिना नदीवरील संगोबा बंधाऱ्यात मांगी तलावातील पाणी सोडावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी दिले आहे.
संगोबा बंधारा करमाळा शहरापासून काही अंतरावर आहे. येथे श्री अदिनाथ मंदीर आहे. येथे कोन्होळा आणि सीना नदीचा संगम होता. येथेच सीना नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. त्यामधील पाणी संपले आहे. या बंधाऱ्याचे पाणी बोरगाव, पोटेगाव, निलज, बाळेवाडी, बिटरगाव श्री, करंजे या गावाना मिळते. हा बंधारा मांगी तालावतील पाण्याने भरल्यास पाणी प्रश्न सुटणार आहे. मांगी तलावातून कान्होळा नदीला पाणी सोडल्यास या बंधाऱ्यात पाणी येऊ शकेल. त्यामुळे येथे पाणी सोडावे, अशी मागणी पाटबंधारे विभागाकडे मनसेचे तालुका अध्यक्ष घोलप यांनी पत्राद्वारे केली आहे.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, तालुका उपाध्यक्ष अशोक गोफणे, राजाभाऊ बागल, शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, विजय रोकडे, रामभाऊ जगताप, सतिश फंड, आनंद मोरे, तेजस राठोड, शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष रोहित फुटाणे, शहर उपाध्यक्ष अजिंक्य, सचिन कणसे कांबळे, महेश डोके, अनिल माने, योगेश काळे, अमोल जांभळे, राजा कुभांर, विजय हजारे, योगेश काळे, स्वप्निल कवडे, बोरगावचे सरपंच विनय ननवरे, शामराव भोई बिटु पवळ, बाबा शिंदे, तानाजी पवळ, किरण कांबळे उपस्थित होते.
संपादन : अशोक मुरुमकर