करमाळा (सोलापूर) : शहरातील सिद्धार्थनगर येथून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुधवारी (ता. ५) सकाळी साडेनऊ वाजता ‘धम्मरॅली’ निघणार आहे. बुधवारी ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागरपूर येथे ५ लाख नागरिकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. सर्व मनुष्य समाजाला महिला व पुरुषांना समानतेची वागणूक असणाऱ्या पवित्र बौद्ध धम्माचा स्वीकार केला. या दिनानिमित्त बुधवारी करमाळा शहरात धम्मरॅली काढली जाणार आहे. त्यानंतर साडेदहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सामूहिक बुद्धवंदना दिली जाणार आहे.


