पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाला जोरदार दणका बसला आहे. येथे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे साधारण ११ हजार मतांनी विजयी झाले आहेत. तर भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालालाची उधळण करत जल्लोष सुरु केला आहे. तर चिंचवडमध्ये मात्र भाजपच्या अश्विनी जगताप या विजयाच्या जवळ आहेत.

पुणे येथील कसबा आणि चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु झाली होती. कसब्यात धंगेकर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. तर चिंचवडमध्येही जगताप या आघाडीवर आहेत. शिवसेनेचे नाव आणि धन्युष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. त्यात भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे यांना हा जोरदार दणका मानला जात आहे.