करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील खडकी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याची पहाणी करून ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी अभिनंदन केले आहे. यामध्ये योगदान देणारे ग्रामपंचायत सदस्य, वृक्षप्रेमी व ग्रामस्थ यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

या वृक्षांची लागवड पूर्णतः ग्रामस्थ खडकी यांच्यातर्फे करण्यात आली असून यांचे संगोपनसुद्धा ते करत आहेत. तालुक्यातील सर्वच ग्रामपंचतींनी अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. १५ व्या वित्त आयोगातर्फे उभारण्यात येणाऱ्या नवीन बस थांब्याचेही यावेळी भूमिपूजन झाले.


