करमाळा (सोलापूर) : संविधानप्रेमी तरुण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे ‘विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक’ या नामकरण फलकाचे अनावरण मंगळवारी (ता. १३) सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी करत करण्यात आले.
करमाळा शहरात भाजी मंडई परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे. येथे संविधानप्रेमी तरुण मंडळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती यांच्या वतीने विद्युत रोषणाई असलेला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा फलक लावण्यात आला आहे. पुतळा परिसरात शुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.


