जाधव यांना आली पहिली ऑफर! ‘राजकीय भवितव्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटात या’

Dramatic developments are currently taking place due to the displeasure of Dattatray Jadhav a supporter of the Sanjay Mama Shinde group MLA from Sade in Karmala taluka

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील साडे येथील आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक दत्तात्रय जाधव यांच्या नाराजीवरून सध्या नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. त्यांनी शिंदे गट सोडायचा निर्णय घेतला आहे. मात्र कोणत्या गटात जायचे हे जाहीर केले नाही. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांना ऑफर दिली असून ‘राजकीय भवितव्य उज्वल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचे’ आवाहन केले आहे.
मनधरणी की दुसरा काय निर्णय? निमगिरे यांच्या गाडीतून जाधव पंचायत समितीच्या आवारातून पडले बाहेर

चिवटे म्हणाले, ‘जाधव यांना शिवसेनेत मानाचे स्थान दिले जाईल. ते चळवळीतील कार्यकर्ते आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी धावून येणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना शिवसेनेतच न्याय मिळू शकतो. त्यांनी राजकीय भवितव्य उज्वल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करून करमाळा तालुक्यात राजकारण करावे.’
बागल गटाचे कार्यकर्ते नीळ यांनी पंचायत समितीच्या उमेदवारीबाबत दिली प्रतिक्रिया

जाधव हे आमदार शिंदे यांच्या गटात कार्यरत आहेत. परंतु त्यांनी शिंदे यांचा गट सोडत असल्याचे जाहीर केले आहे. त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र आपला निर्णय झाला असल्याचे ते सांगत आहेत. हे सांगताना त्यांनी पुढील भूमिका जाहीर केलेली नाही. समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन राजकीय भूमिका ठरवू, असे ते सांगत आहेत. जाधव हे शिवसेनेचे तीन वर्ष उपजिल्हाप्रमुख होते. त्यामुळे चिवटे यांची ऑफर ते स्वीकारतील का हे पहावे लागणार आहे.
जाधव म्हणतायेत माझं ठरलंय! समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याची सरडे यांची प्रतिक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *