करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील पोथरेनाका परिसरात जामखेड रोडवर असलेले करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यामधील व्यापारी सध्या हैराण झाले आहेत. बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गटार तुंबली आहे. त्यामुळे पाणी वर येत असून या भागात दुर्गंधी पसरत आहे. याकडे नगरपालिकेने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी गाळेधारक करत आहेत.
घरोघरी राष्ट्रध्वजाची उभारणी करा; हाजी उस्मानशेठ तांबोळी यांचे आवाहन

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पोथरे नाका परिसरात नगर रॉड व जामखेड रोडला दोन्ही बाजूला गाळे आहेत. गाळेधारक नगरपालिकेला वर्षाचा कर भारतात मात्र सुविधा मिळत नसल्याची तक्रार केली जात आहे. गटार तुंबून देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.
करमाळा पंचायत समितीचे १२ गणातील संभाव्य उमेदवार

जामखेड रोडवरील बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे. रस्त्यावरून हे पाणी घाण ओढ्यापर्यंत येत आहे. त्यामुळे शिवाजी खाडे, गोपळ हवलदार, गौतम पोते, संतोष वाण, प्रविण नरसाळे, बाळासेब आमटे, गणेश पवार, विठ्ठल भणगे, बाळासाहेब पवार, हनुमंत कोल्हे, हनुमंत भांडवलकर आदी गाळेधारकांच्या दुकानांसमोर पाणी येत असल्याने ग्राहकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.

काही ठिकाणी पाणी साचत असून दुर्गंधीही पसरलेली आहे. सध्या पावसाळा सुरु असून पाऊस झाल्यानंतर घाण ओढा येथे पाणी साचत आहे. त्यात गटारीचे पाणी येत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. याकडे त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. सुमारे महिनाभरापसून येथे गटार तुबल्याने पाणी वाहत असल्याचे सांगितले जात असून येथे स्वच्छतागृह देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.


