Video : पुरुषांबरोबर महिलांचाही सक्रिय सहभाग असणारे मंडळ म्हणजे दत्त पेठ तरुण मंडळ!

Dutt Peth Tarun Mandal is a group that has active participation of women along with men

करमाळा (सोलापूर) शहरात महत्वाच्या असलेल्या पेठेंपैकी एक म्हणजे दत्त पेठ! आर्थिक उलाढालीमध्येही ती अग्रेसर आहे. येथील कार्यकर्ते वर्षभर सामाजिक उपक्रम राबवतात. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ते दत्त पेठ तरुण मंडळाच्या माध्यमातून एकत्र येऊन दरवर्षी उत्सव साजरा करतात. यामध्ये महिलांचा सहभाग उल्लेखनीय असतो. डोक्यावर पांढरी टोपी आणि टाळ- मृदूंगाचा गजर अशी या मंडळाची निघणारी मिरवणूक वैशिष्टयपूर्ण असते. यातून ते नेहमीच सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. सद्य परस्थितीवर भाष्य करणारे या मंडळाचे देखावे असतात. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याने पारितोषक मिळवल्याचा आम्ही विक्रम केला असल्याचा दावा या मंडळातील सदस्य करत आहेत.

श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व सुभाष चौक दरम्यानचा भाग म्हणजे दत्त पेठ. शहरातील सर्वात मोठे क्षेत्र असलेली पेठ म्हणून या पेठेचा उल्लेख केला जातो. दत्त पेठेमध्ये पूर्वी भाजी मंडई होती. आर्थिक उलाढालीचे हे करमाळ्याचे केंद्रस्थान होते. येथे दत्त मंदिर व राम मंदिर ही मंदिरे आहेत. या खोलेश्वर रथ उत्सव, मोहरमनिमित्त निघणारी नालसाहेब मिरवणूक, रामनवमीनिमित्त किल्ला विभागातून निघणारी रामाची पालखी व गणेशोत्सवाच्या मिरवणुका याच पेठेतून जातात.

दत्त पेठमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साधारण ५० वर्षांपूर्वी दत्त पेठ तरुण मंडळ सुरु केले, असे सांगितले जाते. या मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. लेझीम, कब्बडी, टिपरी, खोखो, सूरपाट्या असे पारंपरिक खेळ येथे उत्सवादरम्यान घेतले जात. तेव्हा करमाळ्यात पारंपरिक खेळांच्या स्पर्धा घेऊन त्यांनी पारितोषके दिली आहेत.

पुढे मंडळानेकोरोना काळात रुग्णांना व गरजुंना मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. आषाढी वारीनिमित्त येथे येणाऱ्या दिंड्यांमधील वारकऱ्यांची सेवा कार्यकर्ते करतात. या पेठेतील महिला स्वतःच्या हाताने रुचकर जेवण बनवून वारकऱ्यांना देतात. आरोग्य शिबीर, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, महिलांसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात.

याबरोबर विद्यार्थ्यांसाठी मंडळाकडून सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यांना मार्गदर्शन, गरजुंना मदत, व्यख्याने व विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. या उपक्रमांशिवाय दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने दहीहंडी, नागपंचमी निमित्त महिलांचे कार्यक्रम, नवरात्रोत्सवानिमित्त गरबा असे कार्यक्रम येथे घेतले जातात.

मंडळातील पुरुष व महिला सदस्य
सचिन साखरे, श्रेणिकशेठ खाटेर, अभय महाजन, राजुशेठ सोळंकी, डॉ. तुषार गायकवाड, बाळासाहेब देशमुख, विजयसिंग परदेशी, संतोष टांगडे, उदय गायकवाड, तानाजी महामुनी, संग्राम देशमुख, अमोल परदेशी अरुण टांगडे, विश्वजीत परदेशी धनराज महाजन, शिवम टांगडे, चरणसिंग परदेशी, पृथ्वीराज देशमुख, नितीश देवी, पंकज महाजन, सतीश शिंगाडे, योगेश मुथा, रितेश कटारीया, मनोज शहा, वर्धमान खाटेर, बाळासाहेब शियाळ, विकास राजमाने, अथर्व दिवाण, नितीन घोडेगावकर, साजिद बागवान, सनी घोडेगावकर, अमोल बागडे, हर्ष घोडेगावकर, ओम राठोड, ऋषी महाजन, मनोज भणगे, सागर भणगे, विरु देशमुख, बाळासाहेब भणगे, ॲड.आदीत्य साखरे, ओंकार महाजन, अनंत मसलेकर, नितीन दोशी, बन्सी देवी, शिवकुमार चिवटे, पंकज सोळंकी, ओम चोपडे, संदीप बोकन, दिपक तिवारी, अतुल बोकन, विशाल मुंबरे, अजिंक्य महाजन, शिवम घोडेगावकर, आनंद महाजन, महमंद पठाण, शैलेश मारडकर, कृष्णा येळवणे, राजु दळवी, मनोज बलदोटा, सतिश बरिदे, संकेत खाटेर, पप्पु शिंदे, गणेश परदेशी, अमित परदेशी, उदय सुरवसे, सचिन सोरटे, नंदुशेठ दळवी, महावीर शिंदे, ओम शिंगाडे, करण सोळंकी, यशराज टांगडे, फरीद पिंजारी, अनिरुद्ध परदेशी, अभय सोळंकी, प्रज्योत परदेशी, सचिन चिंचकर, तानाजी सुरवसे, आयुब खान, बापु पवार, प्रसाद भोसले, सुरेश चाळक, नवनाथ बरिदे, भाऊ सोरटे, सचिन माने, कैलास बरिदे, प्रणय जाधव, अक्षय जाधव, अभिजित भणगे, अमोल बरिदे, विजय बरिदे, प्रज्योत पोळके, डॉ. दोशी, माजी नगरसेविका संगिता खाटेर, डॉ. सुनिता दोशी, माधुरी साखरे, कावेरी देशमुख, आशा परदेशी, मीना परदेशी, कोमल परदेशी, पूजा परदेशी, मंजुषा टांगडे, डॉ. विनया गायकवाड, उषा महाजन, जया महाजन, तेजश्री देशमुख, स्वप्नाली शियाळ, सुचिता गांधी, स्वाती घोडेगावकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *