करमाळा (सोलापूर) : तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व कोरेगाव पार्क (पुणे) येथील बुद्रानी रुग्णालय यांच्या वतीने बायपास चौक येथे मंगळवारी (ता. 27) डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर झाले. या शिबिरासाठी डॉ. गिरीश पाटील व त्यांची टीमने तपासणी केली. दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन झाले.

शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर लावंड, प्रकाश मुनोत, रसिक मुथा, माजी नगरसेविका मेघा देशपांडे, माजी नगरसेवक नारायण पवार, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर यावेळी उपस्थित होते. खाटेर यांनी करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक, देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने अरुण तांगडे यांनी मनोगत व्यक्त करून दत्त पेठ तरुण मंडळाच्या कामाची माहिती सांगितली. शिबिरासाठी अमोल परदेशीं, नितीन दोशी, संग्राम देशमुख, ललित बलदोटा, विजय देशपांडे, दिनेश मुथा, केतन संचेती, गणेश बोरा, वर्धमान खाटेर, अनंत मसलेकर, भावेश कुंकूलोळ, कोल्हार परदेशीं, संतोष कटारिया, दादा इंदलकर, गिरीश शहा, विजय बरीदे, चंद्रकांत काळदाते, प्रवीण गंधे, अभय शिंगावी, प्रीतम राठोड यांनी परिश्रम घेतले. ऍड. संकेत खाटेर यांनी आभार मानले.
