करमाळा (अशोक मुरूमकर) : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. त्यात सध्या ‘नटीने मारली मिठी’ हि रील सध्या ट्रेंडमध्ये आहे. करमाळ्यातील विक्रम आल्हाट यांनी यावर रील केली आहे. मात्र त्यावरून सध्या त्यांना नेटीझीयन्सनी त्यांना ट्रोल केले आहे. काही समर्थकांनी त्यांना दादा कोंडके यांचा संदर्भ देत जशासच तसे उत्तरही दिले आहे.

लहानांपासून मोठ्यांनाही मोबाईलचे वेड आहे. अनेकांचा दिवसभरातील जास्त कालावधी मोबाईलमधील रील पहाण्यात जातो. त्यात दिवसभरत किती रील पाहिले असतील याची स्वतःलाही कल्पना राहत नाही. त्यात अनेक रील येतात. ट्रेंडमधील रील सर्वांनाचा आवडतात. करमाळ्यातील विक्रीम आल्हाट हे देखील रील स्टार आहेत. त्यांच्या रीलला हजारो व्हियूज येतात. सध्या ‘नटीने मारली मिठी’ ही त्यांची चर्चेत आली आहे.
आल्हाट यांनी ‘नटीने मारली मिठी’ ही रील (त्यातील) नायिकेबरोबर केली आहे. त्यात त्यांनी रंगळी चड्डी परिधान केली आहे. त्यावर त्यांना कमेंट करत प्रश्न केले आहेत. त्यावर मधुसूधन पांडव यांनी उत्तर देत दादा कोंडके यांचा संदर्भ दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘नशीब चड्डिवरून ट्रोल करणारे दादा कोंडकेंच्या काळात नव्हते. उर्फि अर्धनग्न चालते, का तर ती फॅशन आहे. पण गुढग्यापर्यंत चड्डी अश्लील वाटतेय? कलाकार आहेत ते कलेला प्रोत्साहन द्या फुकट ज्ञान देऊ नका.’