सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत पोर्टलवरील जिल्ह्यातील नोंदणीकृत पात्र शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत ई केवायसी (e-KYC) पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
पात्र शेतकऱ्यांना eKYC करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत e-KYC पूर्ण केल्याशिवाय ऑगस्ट 2022 नंतरच्या इतर व बाराव्या हप्त्याच्या पुढील हप्ता वितरीत होणार नाही, असे स्पष्ट निर्देश आहेत.

जिल्ह्यातील एकूण 60,6517 लाभार्थीपैकी 257112 लाभार्थ्यांनी e-KYC पूर्ण केलेले नाही. यामध्ये अक्कलकोट- 25616, बार्शी- 24461, करमाळा-23712, माढा- 28949, माळशिरस- 26549, मंगळवेढा- 18892, मोहोळ- 18815, पंढरपूर-34051, सांगोला- 27483, उत्तर सोलापूर-8492 व दक्षिण सोलापूर- 20092 याप्रमाणे एकूण 257112 लाभार्थ्यांचे e-KYC पूर्ण करणे प्रलंबित आहे. योजनेतील प्रलंबित शेतकऱ्यांनी विनाविलंब त्वरित ई-केवासी करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे.

