‘लंपी’वर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क रहावे : तहसीलदार माने

Farmers should be vigilant to control Lumpi Tehsildar Sameer Mane

करमाळा (सोलापूर) :

Advertisement
जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यातील जनावरांमध्ये ‘लंपी’चा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. केंद्र सरकारने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार अधिसूचित केलेल्या रोगांमध्ये ‘लंपी’चा ‘अनुसूचित रोग’ म्हणून समावेश केलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन ‘लंपी स्किन रोग नियंत्रण समिती’चे अध्यक्ष तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. गटविकास अधिकारी मनोज राऊत व पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे यांनी केले आहे.

तालुक्यामध्ये 91 हजार 500 गाय व म्हैस वर्गीय जनावरे आहेत. लंपी हा विषाणूजन्य रोग गायी व म्हशींमध्ये आढळतो. या रोगात पशुंना ताप येणे, पूर्ण शरीरावर 10 ते 15 मि.मी. व्यासाच्या कडक गाठी येतात व तोंडात, नाकात व डोळ्यांत व्रण येतात. सदरचा विषाणूजन्य रोग प्रादुर्भाव विविध प्रकारचे कीटक गोचिड, गोमाश्या इत्यादीं मार्फत जलद प्रसार होतो.

तालुक्याच्या सीमेवरील अहमदनगर व पुणे जिल्ह्यात या रोगाची साथ वाढत असल्याने करमाळा पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सदर रोगाच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या रोगाला घाबरून न जाता पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेत कळवावे. बाधित जनावरे वेगळी बांधावी. त्यांची चारा, पाणी व इतर अनुषंगिक साहित्य सुद्धा वेगळे ठेवावे.

प्रथम निरोगी जनावरे यांना चारा- पाणी करावे व नंतर बाधित जनावरे यांच्याकडे जावे व त्यांचा चारापाणी करून घ्यावा. बाधित जनावरे यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सल्ल्यानुसार त्वरित औषधोपचार सुरू करावेत. गोठा व लगतच्या परिसरात डास, माशा, कीटक व गोचिड यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी डेल्टामेथ्रिन, सायपरमेथ्रिन सारखी औषधे पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शनानुसार वापरावीत.

सदर रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुपालकांनी घाबरून न जाता जागरूक होण्याचे व नमूद प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन तहसीलदार समीर माने-अध्यक्ष लंपी चर्मरोग संनियंत्रण समिती, गट विकास अधिकारी मनोज राऊत-सदस्य लंपी चर्म रोग संनियंत्रण समिती व पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे-सदस्य सचिव लंपी चर्मरोग संनियंत्रण समिती यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *