करमाळा (सोलापूर) : ‘मतदारांनी ज्या विश्वासाने तालुक्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. त्या विश्वासाला तडा जाऊ न देता काम करणारा आहे. तालुक्यातील वीज व रस्ते यासह पश्चिम भागातील महत्त्वाच्या विषयावर आपण काम करणार आहे. त्याचा रिझल्ट निश्चितच दिसेल. त्यामुळे आपण या विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हा,’ असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.

करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 व वांगी नंबर 2 या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य निळकंठ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली येथे पॅनेल देण्यात आले होते. यामध्ये विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे, महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव माळी, तानाजी झोळ, विलास पाटील, रोहिदास सातव, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, राजेंद्र धांडे, डॉ. गोरख गुळवे, शंकर कवडे, सुहास रोकडे, सचिन देशमुख, अशोक तकिक, सुजित बागल, तात्या सरडे, प्रवीण शिंदे उपस्थित होते.

वांगी नंबर 1 येथील हरिदास तकीक, विठाबाई भोसले, अमोल दैन, सोमनाथ ढावरे, सुरेखा दिवटे, नरसिंग देशमुख, शुभांगी देशमुख यांच्यासह वांगी नंबर 4 येथील आबासाहेब राखुंडे, सविता सुळ, गितांजली देशमुख. वांगी नंबर 2 ग्रामपंचायतमध्ये सुवर्णा भानवसे, विलास ढाणे, सोनाली तकीक, सुरेश जाधव, पुजा चौधरी, वांगी नंबर 3 ग्रामपंचायतमधील सुवर्णा कांबळे, शंकर जाधव, चंद्रकांत कदम, मयुर रोकडे, रोहिणी रोकडे या सदस्यांचा आमदार शिंदे यांच्या हस्ते सत्कार झाला.

