चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयातील विद्यार्थ्यांची श्री कोटलिंग मंदिर व उजनी धरण परिसरात क्षेत्रभेट

Field visit of students of Smt Rambai Babulal Surana Vidyalaya in Chikhalthan to Sri Kotling Mandir and Ujani Dam area

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्पांतर्गत श्री कोटलिंग मंदिर व उजनी धरण परिसरास क्षेत्रभेट दिली. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी व रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प चालविला जातो. या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांना भौगोलिक ऐतिहासिक औद्योगिक घटकांची माहिती व्हावी या उद्देशाने क्षेत्रभेट घेण्यात आली.

या क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यांना उजनी धरणाची माहिती व्हावी व कोटलिंग मंदिराची माहिती आणि त्याचा इतिहास समजावा या दृष्टिकोनातून ही क्षेत्रभेट होती. विद्यार्थ्यांनी तेथील ऐतिहासिक घटनांची नोंद करून घेतली. सदर क्षेत्र भेटीसाठी 650 विद्यार्थी सहभागी झाले होते. कोटलिंग मंदिर समितीचे आत्माराम नेमाने यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

क्षेत्रभेटी यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक गुरुराज माने, रयत अनिवासी गुरुकुल प्रकल्प प्रमुख साईनाथ लोहार, क्षेत्रभेट प्रमुख नवनाथ शेंडगे, शिवाजी मासाळ, सचिन खाडे, धनंजय भोसले, लक्ष्मण गोडगे, अशोक मुंडे, रेवणनाथ जाधव, बिभिषण भोई, श्रीकांत बिराजदार, योगेश धस, सोनाली बुधकर, नूतन धुमाळ यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *