करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालय परिसर स्वातंत्र्य दिनाची पूर्वसंध्या देशभक्तीपर गिताने गजबजला आहे. एकासएक गित सादर होताच प्रेक्षकांकडून टाळ्याची दाद आणि मध्येच भारत मातेचा जयघोषामुळे आनंदमय वातावरण झाले.
तहसिल कार्यालय, पोलिस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, कारागृह विद्युत रोषणाईने झळाळले त्यात संदिप पाटील यांच्या टीमने रसिक प्रक्षेकांची मने आकर्षीत केली.
देशाच्या अमृतमोहत्सवी वर्षानिमीत्त यावर्षी विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. देशभक्ती जागृती व्हावी यासाठी प्रशासनाकडून विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. यंदा प्रथमच तहसिलदार समीर माने, पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे, गटविकस अधिकारी मनोज राऊत यांच्या संकल्पनेतून ‘देशभक्तीपर गीतांचा वंदेमातरम’ हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
‘जय भारत’, ‘ये वतन तेरे लिऐ’, आदी गितांनी मने जिंकली. पोलिस, तहसील व पंचायत समिती यांच्यासह सर्व विभागचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे अॅड. शशिकांत नरुटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, महेश, सुर्यपुजारी, पप्पूशेठ बलदोटा आदी उपस्थित होते.