Flag Day fundraiser starts on 7th December

सोलापूर : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2024 संकलनाचा शुभारंभ 7 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. यावेळी ध्वजदिन 2022 व 2023 निधी संकलनाचे उत्कृष्ठ संकलन केलेल्या कार्यालयांना पारितोषिक वितरण समारंभ ही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार यांनी दिली आहे.

जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित या कार्यक्रमासाठी सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल उगले-तेली, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सोलापूर शहर पोलिस आयुक्त राजेंद्र माने, अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे निवास, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमास जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे प्रमुख जिल्ह्यातील माजी सैनिक,/विधवा/ वीरमाता पिता व वीरपत्नी यांनी जुने जिल्हाधिकारी कार्यालय बहुउद्देशीय सभागृह येथे उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर तुंगार यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *