करमाळा (सोलापूर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचा बनावट शिक्का व सही करून फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वरकाटणे येथील एकाविरुद्ध पोलिसात फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दशरथ मारुती गणगे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पाठीचा आजार असून अनफिट असल्याच्या प्रमाणपत्रासाठी संशयित आरोपी गणगे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे अर्ज केला होता. तो अर्ज करमाळा उपजिल्हा रुग्णालयाकडे तपासणीसाठी आला तेव्हा त्या आर्जवरील ओपीडी क्रमांक दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यावरील सही संबंधित अधिकाऱ्याची नव्हती.
Live : करमाळा शहरासह तालुक्यात उत्सहात गणेशाचे आगमन

संबंधित कागदपत्रावरील सहीसह आढावा व गोल शिक्का देखील बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉ. डुकरे यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.
