करमाळा (सोलापूर) : करमाळा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजकुमार परदेशी (श्रीवास्तव) यांचे शुक्रवारी (ता. १६) दुपारी ३ वाजताच्या दरम्यान निधन झाले आहे. राजुशेठ हलवाई या नावाने ते परिचीत होते.
राजूशेठ हलवाई हे राशिन पेठ तरुण मंडळाचे आधारस्तंभ होते. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आदर्श मित्रत्वाचे नाते जपणारे, कोणताही गर्व नसणारे ते होते. राजू शेठ हलवाई यांच्या निधनाने मनाला धक्का बसला असून राजू शेठ परदेशी यांच्या जाण्याने परदेशी कुटुंबावर दुःखाचा घाला झाला आहे त्यातून सावरण्याची शक्ती आई कमलाभवानीने त्यांना देवो, असे शिवसेनेचे महेश चिवटे यांनी सांगितले आहे.
संपादन : अशोक मुरुमकर