Former MLA Sanjaymama Shinde inspects the work of the new building of Karmala SubDistrict Hospital

करमाळा (सोलापूर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पहाणी केली. २०१९ ते २४ दरम्यान अनेक महत्त्वाच्या कामांसाठी माजी आमदार शिंदे यांनी कोट्यावधीचा निधी आणला होता. त्यापैकी करमाळा उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत व अधिकारी कर्मचारी – वसाहत बांधकामांसाठी ४३ कोटी निधी आणला होता. ही दोन्हीही कामे पूर्णत्वाकडे आलेली आहेत. लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे.

या कामासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जुलै २०२१ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली तर तांत्रिक मान्यता फेब्रुवारी २०२२ मध्ये मिळाली. या इमारतीत तळमजला आणि इतर दोन मजले आहेत. 7320.21 चौमी बांधकामाचे क्षेत्रफळ आहे. यामध्ये बेसमेन्ट मजल्यावरती
वाहनतळ, ऑक्सीजन सिलेडर स्टोअर असणार आहे.

तळ मजल्यावर तपासणी केंद्र, एलडीआर-1 आणि एलडीआर-2, विलगीकरण कक्ष (Isolation ward), एचडीयू, चाइल्ड ओपीडी, एएनसी वॉर्ड, ऑपरेशन थिएटर टॉयलेट प्रस्तावीत आहेत. पहिल्या मजल्यावर पीएनसी वॉर्ड, पेडियात्रिक वॉर्ड, आयसीयू, फिमेल सर्जिकल वॉर्ड, फिमेल मेडिकल वॉर्ड, डायालिसीस सेंटर असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर मेल सर्जिकल वॉर्ड, मेल मेडिकल वॉर्ड, वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कॉन्फरन्स रूम, संगणक रुम असणार आहेत.

याशिवाय भूमिगत पाण्याची टाकी, सेप्टीक Tank, रेनवाटर हार्वेस्टिंग, भूविकास (पार्कस आणि गार्डन), अंतर्गत रस्ते संरक्षक भिंत व गेट व विद्युत विषयी कामांचा समावेश आहे. आतापर्यंत या कामावर १७३३.६७ लक्ष खर्च झालेला आहे. उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारत बांधकाम पूर्ण झाले असून दरवाजे, खिडक्या व रंगकाम बाकी आहे. हे काम पूर्ण झाले की इमारत रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *