करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील वेताळ पेठ येथील गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लब, खडकपुरा मित्र मंडळ, श्री संत गोरोबाकाका मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाचे मंगळवारी (ता. ६) गुलालाची उधळण करत बँजोच्या तालात वाजत गाजत विसर्जन करण्यात आले. यावेळी करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

कोरोनानंतर यावर्षी करमाळा शहरात गणेशोत्सव जोरदारपणे साजरा होत आहे. मंगळवारी करमाळा शहरातील प्रमुख मार्गावरून सातव्या दिवशी विसर्जन होणाऱ्या गणेशाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी डीजेच्या तालावर नाचत आनंद घेतला. करमाळ्यातील मेन रोडवर गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लब, श्री संत गोरोबाकाका मित्र मंडळ, नागनाथ मित्र मंडळ, खडकपुरा मित्र मंडळ यांच्या एकापाठोपाठ एक अशी वाजत- गाजत मिरवणूक निघाली.
– Video : करमाळा शहर व ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येऊन ‘सरकार’च्या माध्यमातून घेतला सामाजिक वसा
– Video सर्वधर्मसमभावचे दर्शन! करमाळा शहरात साधारण ५०० मीटरवर असलेल्या सहा ‘श्रध्दास्थाना’मध्ये होतोय गणेशोत्सव
– Video : मुलं दत्तक घेऊन जपली सामाजिक बांधिलकी! १९६५ पासून एकदाही अध्यक्ष न नेमलेले करमाळा शहरात गणेशोत्सव मंडळ
– Video नंदन प्रतिष्ठान : वेगवेगळ्या क्षेत्रातील तरुण एकत्र येऊन राबवतायेत सामाजिक उपक्रम