करमाळा (सोलापूर) : येथील गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबच्या गणेशोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची नियोजनासाठी बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची निवडी करण्यात आल्या. त्यात अध्यक्ष म्हणून अल्ताफ शेठ दारूवाले, उपाध्यक्ष म्हणून संतोष लोकरे व खजिनदार म्हणून योगेश सोरटे व संतोष वेंगलम यांच्यासह इतर निवडी झाल्या आहेत. या निवडीनंतर पदाधिकार्यांचे सत्कार करण्यात आले.

गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबच्या गणेशोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडीसह मिरवणूकपदी निखिल बनकर व सचिवपदी आशिष शेठ मंडलेचा यांची निवड झाली आहे. गजानन गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबचे हे 23 वर्ष असून यावर्षी कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

मंडळाच्या या गणेशोत्सवामध्ये आरोग्य शिबिर घेणे व विविध स्पर्धा घेणे असा मानस असून सामाजिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मंडळाचे संस्थापक माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, समीर बागवान, चेतन ढाळे, अक्षय ढाळे, अमित ढाळे, कुणाल ढाळे, चिन्मय मोरे, शरीफ दारूवाले, दिगंबर ठोंबरे, संजू ढाळे, संदीप ओतारी, प्रीतम बलदोटा, भावेश देवी, निखिल ढाळे, पंकज ढाळे, इर्शाद शिकलकर, रामा धोकटे, विशाल शेळके, संकेत पुराणिक, चेतन कायस्थ, बाबा खराडे, सुधीर शहाणे, रोहित चिवटे, सुमित ढाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक उमेश माळवे, प्रकाशशेठ बलदोटा, डॉ. गजेंद्र विभुते, प्रदीप ढाळे, विकास ढाळे उपस्थित होते.


