करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील जय महाराष्ट्र चौकात सरकार मित्र मंडळाच्या श्री गणेश मूर्तीची आरती करण्यासाठी राष्ट्रवादीचे पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके येणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते सत्कार होणार आहे. शुक्रवारी (ता. २) सायंकाळी ६ वाजता हा सत्कार होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली आहे.
करमाळा शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन सरकार मित्र मंडळ स्थापन केलेले आहे. यामध्ये सामाजिक बांधिलकी सांभाळत अनेक कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे हेही आहेत. राजकारण विरहित या मंडळाचे काम सुरु असते. आमदार लंके यांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोना कालावधीत कोविड सेंटर सुरु केले होते. त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा झाली होती. त्याच धर्तीवर वारे यांनीही करमाळा तालुक्यातील पोथरे येथे कोविड सेंटर सुरु केले होते.


