करमाळा (सोलापूर) : गौरी- गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्क रहा असे आवाहन पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांनी सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामसुरक्षा यंत्रणाच्या माध्यमातून केले आहे. सध्या सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे. याबरोबर आज (रविवारी) गौरी पूजन आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गौरीना दागिने घातले जातात. याबरोबर महिला दागिने परिधान करून हळदी- कुंकासाठी जातात. दरम्यान चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सतर्क राहणे आवश्यक आहे. पोलिस पाटील यांनाही त्यांनी सूचना देण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी असे प्रकार होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी, असे गुंजवटे यांनी म्हटले आहे.


