करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या सायकल बँक संकल्पनेतून करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी गावकऱ्यांना आवाहन केल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते महादेव पवार व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ब्रम्हदेव केकान यांनी शाळेतील विद्यार्थिनीसाठी दोन सायकली स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शाळेस भेट दिल्या. डॉ. संदीप पाटील यांनी पाच सायकली देऊ केल्या आहेत.

यावेळी सरपंच अमर ठोंबरे, उपसरपंच चंद्रकांत केकान, ठोकळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वसंत केकान, पोलिस पाटील नवनाथ केकान, नागनाथ केकान उपस्थित होते.

करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत ,गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, केंद्रप्रमुख आजिनाथ तोरमल यांनी कौतुक केले आहे. यावेळी मुख्याध्यापक संजयकुमार वाघमारे, श्रीकृष्ण काळेल, कृष्णा आदलिंग, संतोष वाघमोडे, तात्यासाहेब जगताप, शंकर आदलिंग, मीनाक्षी कात्रेला, सुनीता जाधव उपस्थित होते.
