धायखिंडी येथे खून! पोलिसांना खोटी माहिती देणे पडले महागात

Giving false information to the police was action

करमाळा (सोलापूर) : ‘तालुक्यातील धायखिंडी येथे खून झाला आहे’, अशी फोनच्या माध्यमातून खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रोहन दिलीप सोरटे असे गुन्हा दाखल करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. नागरिकांना अडचणीच्या काळात तत्काळ मदत व्हावी म्हणून देण्यात आलेल्या ११२ या क्रमांकावर संशयित आरोपीने मोबाईलवरून पोलिसांना माहिती दिली होती, यापुढे जर अशी खोटी माहिती कोणी दिली तर त्याची जि केली जाणार नाही असा इशारा पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिला आहे.

संशयित आरोपी सोरटे याने पोलिसांना 112 नंबरवर फोनकरून माहिती दिली. त्यात धायखिंडी येथे खून झाला असल्याचे त्याने सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी गावात जाऊन चौकशी केली तेव्हा गावात असा प्रकार घडला नसल्याबाबत समजले. त्यावरून करमाळा पोलिसांनी फोन आलेल्या नंबरची माहिती घेतली. तेव्हा हा बनावट कॉल असल्याचे समोर आले.

यामध्ये पोलिस नाईक प्रदीप जगताप यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. 112 नंबर हा नागरिकांची सुविधा व्हावी म्हणून देण्यात आला आहे. याचा कोणीही गैरवापर करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा कोकणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *