करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आळजापूर येथे जमीनाच्या कारणावरून नातवाने ८५वर्षाच्या आजोबांना दगडाने मारहाण केली असल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये आजोबांच्या फिर्यादीवरून नातवाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. कशीस आप्पा घोडके (रा. अळजापुर, ता. करमाळा) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर अर्जुन श्रीपती घोडके (वय 85, व्यवसाय शेती, रा. अळजापुर, ता. करमाळा, जि. सोलापुर) असे फिर्यादीचे नाव आहे.
अर्जुन घोडके यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, मुलीच्या घरी झोपलो असता नातु कशीस हा दारु पेवून आला. घरी येवून दरवाजेवर लाथा मारुन म्हणाला की, तु जमीन माझे नावे करन दे नाही तर तुला जीवत सोडणार नाही. असे म्हणत जवळ पडलेला दगड घेवून हतावर मारुन जखमी केले आहे. फिर्यादीचा जावाई भांडणे सोडविण्यासाठी आला. तेव्हा त्यांना चावा घेवून जखमी केले आहे. यामध्ये संशयित आरोपी कशीस घोडकेविरुध्द 452, 325, 324, 504 व 506 कलमप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रणदिवे तपास करत आहेत.