करमाळा (सोलापूर) : येथे भाजपच्या संपर्क कार्यालयात एकात्म मानवदर्शन आणि अंतोदयाचे प्रणेते, उत्कृष्ट संघटक, श्रद्धेय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. २५) अभिवादन करण्यात आले. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून हे अभिवादन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम ही घेण्यात आला. कार्यक्रमासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, डबल महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, किसन मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, ओबीसी मोर्चा तालुकापाध्यक्ष प्रकाश ननवरे, अशोक शहा, संजय किरवे, संदीप काळे, सोमा भागडे, सचिन शेळके, मनोज मुसळे, लक्ष्मण काळे उपस्थित होते.


