करमाळा (सोलापूर) : हिसरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
बहुजन समाज पार्टीचे राजेश पवार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नाचून साजरी न करता त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचून साजरी करणे ही काळाची गरज आहे. बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी बहुजन समाजातील युवकानी पुढे आले पाहिजे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोमनाथ ठोंबरे, पैलवान बाळासाहेब पवार, ग्रामपंचायत सदस्य विकास ननवरे, अनिल साळुंखे, हनुमंत पवार, सोमनाथ ओहोळ, महेश पवार, बाळू पवार, सूरज पवार, अभिजित लोंढे, नितिन भोसले, गौतम ओहोळ, बंटी ओहोळ, रमाई महिला बचत गटाच्या सारिका पवार उपस्थित होत्या.
संपादन : अशोक मुरुमकर