करमाळा (सोलापूर) : सरकारच्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत शहरातील नगरपालिकेच्या साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा येथे क्रांती दिनानिमित्त (9 ऑगस्ट) सामूहिक राष्ट्रगीत गायन झाले.

शाळेच्या मैदानावर सर्व विद्यार्थीनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभ्या होत्या. विद्यार्थिनी कार्तिकी सुरवसे हिने हार्मोनियमवर उत्कृष्टपणे राष्ट्रगीताला सुरुवात केली. संस्कृती वीर आणि समीक्षा थोरे यांनी आपल्या खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हटले. सर्व विद्यार्थिनींनी त्यांना साथ देत ‘समूह राष्ट्रगान कार्यक्रम’ उत्साहात पार पाडला. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक चौधरी यांच्यासह सर्व शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले. साने गुरूजींच्या ‘बलसागर भारत होवो’ या समुहगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.