करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथे रब्बी हंगामातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रशिक्षण शिबीर झाले. सेवा पंधरवाडानिमित्त हे प्रशिक्षण झाले. यावेळी जालना येथील वसंतराव नाईक कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी उद्धव खेडेकर यांनी ‘कांदा बीज उत्पादन व कांदा लागवडीपासून साठवणी पश्चात तंत्रज्ञान वापरून उत्पादन कसे वाढवायचे’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी कुर्डूवाडी उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कांदा लागवड करण्यास येणाऱ्या अडचणी उत्पादकता या विषयावर शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नाची निरसन खेडेकर यांनी केले. मंडळ कृषी अधिकारी अनिल चव्हाण, कृषी पर्यवेक्षक संदीप गायकवाड व कृषी विभागातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. मारुती जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी कृषी सहाय्यक डी. व्ही. नवले यांनी परिश्रम घेतले.


