करमाळा (सोलापूर) : सोलापूर जात पडताळणी समितीच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीबाबत संशोधन अधिकारी सचिन कौले यांनी मार्गदर्शन केले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करून एकही विद्यार्थी जात पडताळणीपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांच्या सुचनेनुसार जात पडताळणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आहे. ‘शिक्षणातून विद्यार्थ्यांचा उत्कर्ष होतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यास केल्यास यश मिळते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणीसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांबाबतही कौले यांनी मार्गदर्शन केले. एकही विद्यार्थी जात पडताळणीपासून वंचित राहू नये असे आवाहनही त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक, जात पडताळणी कार्यालयाचे खटके, अलिम शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी तर आभार प्रा. सुवर्णा कसबे यांनी मानले.


