करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढारचिंचोली येथील हभप वसंतराव दशरथ गलांडे (साळुंखे) यांचे शुक्रवारी (ता. २६) वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यावर कोंढारचिंचोली येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. ते कोंढारचिंचोलीचे माजी सरपंच होते. पुणे येथील सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे यांचे ते वडील होते. दिलीप गलांडे हे त्यांचे दुसरे चिरंजीव होते. तर सरपंच निलिमा गलांडे यांचे ते सासरे होते. एक कन्या, सुना, नातवंडे त्यांच्या पश्चात परिवार आहे.