करमाळा (सोलापूर) : 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ‘हर घर तिरंगा’मध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घराच्या इमारतीवर व दुकानावर तिरंगा झेंडा लावावा, असे आवाहन पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष व करमाळा मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केले आहे.
ठेवीदारांनी घाबरू नये! करमाळा अर्बन बँक सुस्थितीत : चेअरमन कन्हैयालाल देवी

तांबोळी म्हणाले, तमाम भारत वासीयांच्या मनात स्वातंत्र्य लढ्यांच्या स्मृती तेवत राहव्यात देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले. त्या हुतात्मा व क्रांतीकारक नायकांचे व स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. आपल्या देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात रहावी आपल्या देशाप्रती भक्ती सह कृतज्ञतेची जाणीव वृद्धींगत व्हावी हाच हया मागचा उद्देश आहे.
वाशिंबे, पारेवाडी येथील रेल्वे गेटबाबत शिष्टमंडळ खासदार निंबाळकर यांच्या भेटीला
त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराच्या इमारतीवर व दुकानावर राष्ट्रध्वजाची उभारणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे. तसेच ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येणार आहे अश्या प्रत्येक ठिकाणी काळजीपूर्वक त्याची प्रतिष्ठा राखुन तो स्पष्ट पणे दिसेल अशा रितीने लावण्यात यावा. तसेच महाराष्ट्र शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडुन ज्या मार्गदर्शक सूचना प्रसारित होईल त्या सर्व नियमांचे शंभर टक्के पालन करून राष्ट्रध्वजाची उभारणी करावी असे आवाहन तांबोळी यांनी केले आहे.