माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा आज वाढदिवस! एक दिलखुलास व्यक्तीमत्व, धडाकेबाज निर्णय घेऊन त्यांच्या कार्यकाळात रस्ता, वीज व पाणी यासाठी केलेली कामे आजही मतदारांच्या ह्रदयात आहेत. म्हणूनच ‘रोडकिंग’, ‘पाणीदार आमदार’ या उपाधी त्यांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दिल्या! पारदर्शक कारभार केलेले आमदार म्हणून त्यांना ओळखले जाते.
गैरव्यहावराचा एकही आरोप त्यांच्यावर नाही. संघर्षाचा वारसा लाभलेला आणि करमाळा तालुक्याच्या विकासाचा ध्यास घेतलेला हा लोकनेता खडतर असा संघर्ष करून विधानसभेत पोहचला. त्याचा पुरेपूर फायदा तालुक्यासाठी त्यांनी करून दिला. दहिगाव सारखा रखडलेला प्रकल्प, पश्चिम भागातील वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेले रस्ते, विजेचा प्रश्न त्यांनी सोडवला. सोलापूर जिल्ह्याला वैभव मिळवून दिलेल्या उजनीसाठी करमाळा तालुक्याचा सर्वात मोठा त्याग आहे. त्यामुळे पुनर्वसित गावांचे प्रश्न सुटावेत म्हणून त्यांनी प्रयत्न केला. सत्ता नसतानाही त्यांनी या गावांचा दौरा करून जलप्रदूषण, पाण्याचे नियोजन व्हावे म्हणून लोकभावना लक्षात घेऊन सलग १० ते १५ दिवस गावांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सरकार दरबारी त्यांनी मांडल्या आहेत.

तालुक्यातील जनतेने त्यांच्यावर जो विश्वास टाकला तो सार्थ करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. निवडणुक काळात जनतेला जाहिरनाम्याच्या माध्यमातून दिलेले शब्द कामाच्या रूपातुन पुर्ण करण्यासाठी त्यांनी तन मन व धनाने प्रयत्न केले. त्यांनी अनेक कामे मंजुर करून कार्यक्षमता सिध्द केली आहे. जनतेने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी पदाचा वापर केला. तालुक्याचा सर्वांगिण विकास हेच आपलं सुत्र आणि हवं तर ध्येय समजून त्यांनी काम केले.
माजी आमदार पाटील यांच्या जीवनातील अनेक वर्षाचा काळ हा लाल मातीची शान वाढवण्यासाठी गेला. तरीही त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कामांना मान्यता मिळवली. सरपंच पदापासुन ते पंचायत समितीचे सभापती पदापर्यंत विविध विभागाचा अनुभव त्यांनी घेतला होता. शासकीय अधिकारी व यंत्रणा कशी हाताळावी याचा अनुभव त्यांना होता.
आमदार झाल्यानंतर त्यांनी रखडलेली दहिगाव उपसा सिंचन योजना मार्गी लावली. त्यांचे वडील कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी आबा आमदार झाल्यावर सांगितलेले ते पहिले काम होते. या कामावर तालूक्याच्या पुर्व भागातील लाखो शेतकरी कुटुंबाचे भविष्य आधारित होते. ग्राऊंड लेवलवर काम करताना आलेल्या अडचणींकडे पाठ करत विकास कामाचा घेतलेला ध्यास त्यांनी पूर्ण केला. यामुळेच जवळपास २५ हजार एकर जमीन ओलिताखाली आली.
करमाळा तालुक्यात अनेक ठिकाणचे रस्ते खराब व नादुरूस्त होते. अनेक गावे याचा परिणाम भोगत होती. पण माजी आमदार पाटील यांनी यात विशेष लक्ष देऊन अर्थसंकल्पात हे रस्ते समाविष्ट केले. निधीसाठी पाठपुरावा केला. त्यांनी फक्त राज्यच नाही तर केंद्र सरकारकडूनही निधी मिळवला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अथवा अन्य विभागांतर्गत काही रस्ते मंजुर करून घेतले. यामुळे अनेक रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले. कोर्टी ते जिंती हा अनेक वर्ष रखडलेला रस्ता अथवा केतुर ते पोमलवाडी रस्ता, डिकसळ पुल, केम- भाळवणी रस्ता, घोटी परिसरातील रस्ते यासह मतदार संघातील अनेक रस्ते त्यांनी मार्गी लावले.
करमाळा तालुक्याला कुकडीचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी माजी आमदार पाटील यांनी मनापासून प्रयत्न केले. ‘चारी फोडून पाणी वळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे’, हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जीवाची परवा न करता स्वतः चाऱ्यांवर गस्त सुरु केला. पाणी सुरु असताना योग्य नियोजन त्यांनी केले. त्यामुळे सर्वसामान्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले होते.
२०१४ ते २०१९ हा काळ हा काळ अजूनही मतदारांच्या लक्षात आहे. म्हणूनच त्यांना मतदारसंघातील नागरिकांनी त्यांना कार्यसम्राट, पाणीदार, विकासरत्न, लोकनेते, रोडकिंग व जनतेचे आमदार या पदव्या दिल्या. म्हणूनच पुन्हा एखादा करमाळा तालुक्याला चांगले दिवस यावेत म्हणून त्यांना पुन्हा आमदार करणे हीच खरी कार्यकर्त्यांची सदिच्छा आहे!
- प्रतिनिधी
advt