करमाळा (सोलापूर) : करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांची अचानक बदली झाली आहे. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली झाली असल्याने उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची करमाळ्यात ओळख झाली होती. कायद्यासमोर सर्व समान असे मानून त्यांनी करमाळ्यात कामकाज केले. कार्यकाळ स्वीकारल्यापासूनच त्यांनी जोरदार काम सुरु केले होते. सोलापूर जिल्ह्यातील माझा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे बदली झाली असल्याचे कोकणे यांनी सांगितले आहे.

श्रीकांत पाडुळे यांची बदली झाल्यानंतर पोलिस निरीक्षक कोकणे हे करमाळा येथे आले होते. त्यानंतर साधारण दीड वर्ष त्यांनी करमाळ्यात काम पहिले. त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय झाले तर काही प्रकरणात त्यांच्यावर नाराजीही व्यक्त करण्यात येत होती.

