सातोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कदम तर उपसरपंचपदी खुपसे

He was promoted to Sarpanchpadi and Deputy Sarpanchpadi of Satoli Grampanchayat

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सातोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामविकास आघाडीचे मनोहर कदम यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी भास्कर खुपसे यांची बिनविरोध निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये कै. शंकरराव साळुंके बापू यांच्या विचारांच्या सातोली ग्रामविकास आघाडीने बहुमत मिळवून वर्चस्व सिध्द केले होते. दिगंबरराव साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणूकीत त्यांनी विजय मिळवला होता.

येथील सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते. त्यात कदम हे एकमेव उमेदवार होते. उपसरपंचपदासाठी ग्रामविकास आघाडीचे खुपसे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. येथे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून के. के. खराव यांनी तर सहायक म्हणून तलाठी उमेश बनसोडे, ग्रामसेवक तळेकर यांनी काम पाहिले. पोलिस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी यावेळी बंदोबस्त ठेवला होता. ग्रामपंचायत सदस्य वनिता पाडसे, पल्लवी फरतडे, रोहिणी साळुंके, वैशाली भोगे, विजय साळुंके यावेळी उपस्थित होते.

निवडणूक यशस्वी व्हावी म्हणून मोहिते पाटील गटाचे समर्थक भाजपचे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंके, अजिनाथ फरतडे, राहुल चव्हाण, प्रविण साळुंके, विठ्ठल फरतडे, सुहास फरतडे, संग्राम साळुंके, महादेव साळुंके, अशोक मुटेकर, राजाभाऊ साळुंके, नवनाथ फरताडे, रोहिदास चव्हाण, अनिल यादव, उमेश साळुंके, कल्याण फरतडे, ब्रह्मदेव साळुंके, महारुद्र मेटे, विकास पाडसे, गणपत चव्हाण, राम मस्के, बापू जाडकर, अण्णा गावडे, अरुण गाडे, मोहन गाडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *