करमाळा (सोलापूर) : ‘तुला मस्ती आली आहे काय, आम्हाला ट्रॅक्टर आडवा आडवा का लावतो’ असे म्हणत उसतोडायचा कोयता, लाकडी काटी व हाताने मारहाण करून एकाला जखमी केल्या असल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील हिंगणी येथे घडला आहे. यामध्ये चौघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र गजेंद्र बाबर, सागर राजेंद्र बाबर, सुहास गजेंद्र बाबर व दादासाहेब किसन बाबर (सर्व रा. हिंगणी, ता. करमाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये हनुमंत बिभीषण तावरे (वय 25, रा. हिंगणी, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे.
Video : ‘करमाळ्याचा राजा’ समजल्या जाणाऱ्या मंडळाची सामाजिक बांधिलकी कायम! बाल मंडळाचाही पेठेत सीसीटीव्ही बसवण्याचा निर्धार
तावरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, ३ तारखेला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास हिंगणी येथे शेती नांगरण्यासाठी हिंगणी ते कुंभारगाव रोडने ट्रॅक्टर घेऊन संशयित आरोपी राजेंद्र बाबर यांच्या घरा समोरून जात होतो. तेव्हा सागर बाबर, सुहास बाबर यांची चार चाकी रस्त्यावर लावलेली होती. तेव्हा मी ट्रॅक्टरचा हॉर्न वाजवला. त्यानंतर सागर व सुहास बाबर घराच्या बाहेर आले. त्यांनी मला काही एक न बोलता शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी चार चाकीच्या बाजूने ट्रॅक्टर घेतली. शेतीचे काम करण्यासाठी गेलो.

तेथील काम झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास शेतातील काम करून बाबर यांच्या घरा समोर आलो. तेव्हा सागर बाबर माझ्याजवळ आला. त्याने ट्रॅक्टर बंद करण्यास सांगितले. तुला मस्ती आले का? तू आम्हाला ट्रॅक्टर आडवा लावतो का?, असे म्हणत शिवेगाळ केली. दरम्यान सुहास बाबर, सागर बाबर यांनी लाकडी काठीने व दगडाने मारहाण केली. तर राजेंद्र बाबर याने ऊस तोडीचा कोयता घेऊन आला. त्या कोयत्याने त्याने मला मारून जखमी केले. दादासाहेब किसन बाबर यानी हाताने दोन्ही कानांवर मारहाण केली. तुझे पाय तोडतो असे म्हणून त्यांनी धमकी दिली. त्यानंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथून पुढे उपचारासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल केले होते.

